विराण्या : अभंग २५ - Part 2
४१.
अवगुणांचे हातीं ।
आहे अवघी फजिती ।।१।।
नाहीं पात्रासवें चाड ।
प्रमाण तें फिकें घोड ।।ध्रु .।।
विष तांब्या वाटी ।
भरली लावूं नये होटीं ।।२।।
तुका म्हणे भाव ।
शुद्ध बरा सोंग वाव ।।३।।
४२.
हरीच्या जागरणा ।
जातां कां रे नये मना ।।१।।
कोठें पाहासील तुटी ।
आयुष्य वेचे फुकासाटीं ।।२।। ? ।।ध्रु .।।
ज्यांची तुज गुंती ।
ते तों मोकलिती अंतीं ।।२।।
तुका म्हणे बरा ।
लाभ काय तो विचारा ।।३।।
४३.
धर्माची तूं मूर्ती ।
पाप पुण्य तुझे हातीं ।।१।।
मज सोडवीं दातारा ।
कर्मापासूनि दुस्तरा ।।ध्रु .।।
करिसी अंगीकार ।
तरी काय माझा भार ।।२।।
जिवींच्या जीवना ।
तुका म्हणे नारायणा ।।३।।
४४.
ब्रह्मादिक लाभासि ठेंगणे ।
बळिये आह्मी भले शरणागत ।।१।।
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ ।
जाला पद्मनाभ सेवार्हुनी ।।ध्रु .।।
कामधेनुचिया क्षीरा पार नाहीं ।
इच्छेचिये वाही वरुषावे ।।२।।
बैसलिये ठायीं लागलें भरतें ।
त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ।।३।।
हरी नाहीं आह्मां विक्ष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ।।४।।
तुका म्हणे बहु लाटे भोजन ।
नाहीं रिता कोण राहत राहों ।।५।।
४५.
दुजें खंडे तरी ।
उरला तो अवघा हरी ।।
आपणाबाहेरी ।
न लागे ठाव धुंडावा ।।१।।
इतुलें जाणावया जाणा ।
कोंडें तरी मनें मना ।।
पारधीच्या खुणा ।
जाणतें चि साधावें ।।ध्रु .।।
देह आधीं काय खरा ।
देहसंबंधपसारा ।।
बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ।।२।।
तुका करी जागा ।
नको चाचपूं वाऊगा ।।
आहेसी तूं आगा ।
अंगीं डोळे उघडी ।।३।।
४६.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१।।
अइका जी तुझी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।ध्रु .।।
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें ।।२।।
तुका म्हणे देहाचे अवयव ।
सुख दु:ख जीव भोग पावे ।।३।।
४१.
अवगुणांचे हातीं ।
आहे अवघी फजिती ।।१।।
नाहीं पात्रासवें चाड ।
प्रमाण तें फिकें घोड ।।ध्रु .।।
विष तांब्या वाटी ।
भरली लावूं नये होटीं ।।२।।
तुका म्हणे भाव ।
शुद्ध बरा सोंग वाव ।।३।।
४२.
हरीच्या जागरणा ।
जातां कां रे नये मना ।।१।।
कोठें पाहासील तुटी ।
आयुष्य वेचे फुकासाटीं ।।२।। ? ।।ध्रु .।।
ज्यांची तुज गुंती ।
ते तों मोकलिती अंतीं ।।२।।
तुका म्हणे बरा ।
लाभ काय तो विचारा ।।३।।
४३.
धर्माची तूं मूर्ती ।
पाप पुण्य तुझे हातीं ।।१।।
मज सोडवीं दातारा ।
कर्मापासूनि दुस्तरा ।।ध्रु .।।
करिसी अंगीकार ।
तरी काय माझा भार ।।२।।
जिवींच्या जीवना ।
तुका म्हणे नारायणा ।।३।।
४४.
ब्रह्मादिक लाभासि ठेंगणे ।
बळिये आह्मी भले शरणागत ।।१।।
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ ।
जाला पद्मनाभ सेवार्हुनी ।।ध्रु .।।
कामधेनुचिया क्षीरा पार नाहीं ।
इच्छेचिये वाही वरुषावे ।।२।।
बैसलिये ठायीं लागलें भरतें ।
त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ।।३।।
हरी नाहीं आह्मां विक्ष्णुदासां जगीं ।
नारायण अंगीं विसावला ।।४।।
तुका म्हणे बहु लाटे भोजन ।
नाहीं रिता कोण राहत राहों ।।५।।
४५.
दुजें खंडे तरी ।
उरला तो अवघा हरी ।।
आपणाबाहेरी ।
न लागे ठाव धुंडावा ।।१।।
इतुलें जाणावया जाणा ।
कोंडें तरी मनें मना ।।
पारधीच्या खुणा ।
जाणतें चि साधावें ।।ध्रु .।।
देह आधीं काय खरा ।
देहसंबंधपसारा ।।
बुजगावणें चोरा ।
रक्षणसें भासतें ।।२।।
तुका करी जागा ।
नको चाचपूं वाऊगा ।।
आहेसी तूं आगा ।
अंगीं डोळे उघडी ।।३।।
४६.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१।।
अइका जी तुझी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।ध्रु .।।
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्र्वरपूजनाचें ।।२।।
तुका म्हणे देहाचे अवयव ।
सुख दु:ख जीव भोग पावे ।।३।।